या उल्का वर्षावा बद्दल केलेले बहुतेक अंदाज चुकीचे ठरले. 

सिंह राशीतील हा उल्का वर्षाव पाहण्यास मी वांगणी येथे गेलो होतो. परिस्थिती अनुकूल होती. आकाश पूर्णपणे निरभ्र होते. परंतु अपेक्षेपेक्षा खूप कमी उल्का दिसल्या. पूर्ण रात्रीत जेम तेम  ८० उल्का दिसल्या. हा आकडा जरी मोठा वाटला तरी यात अंधुक उल्का पण धरल्या आहेत. मोठ्या , तेजस्वी फक्त १०-१२ दिसल्या. 

असो.. यंदा सिंहाने म्यांवच केले. पुढे केव्हातरी तो पुन्हा गर्जेल अशी आशा करू. 

१३-१४  डिसेंबरला मिथुन राशीतील जेमिनिडस उल्का वर्षाव येत आहे. हा सहसा निराश करत नाही. पण यात अतितेजस्वी उल्का दिसत नाहीत.