याचे कारण हिंदू धर्मात जे नाहीत ते हाताने मीठ देत असतील, शनिवारी तेल आणत असतील.

आजच्या काळात लागू होणारे प्रकार काढायला हवेत.

म्हणजेः

१. बी पी ओ मध्ये काम करणाऱ्या स्त्रीने रविवारी फोनला हात लावायचा नाही.

२. लहान बाळाने रविवारी आईच्या हातूनच जेवायचे.

३. घरात सवाष्ण आली की तिला जाताना कुंकू न लावता 'हग' द्यायचा. (हग = मिठी, उगाच मराठी वापरले नाही असे व्हायला नको. )

४. नवरा ऑफीसला जाताना पत्नीने पलंगावर लोळायचे, अजिबात दारात यायचे नाही.

५. मुलांची मुंज करताना त्यांना 'दस बहाने' सारखीच गाणी ऐकवायची, कारण नंतर काय ऐकायला मिळेल माहीत नाही.

६. उंबऱ्यात उभे राहता येणार नाही (कारण उंबरेच नसतात ) म्हणून पायपुसण्यावर उभे राहायचे नाही असा नियम करायचा.

वगैरे!