द्वारकानाथ,

आपण अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पैकी एकाचा विचार करुया.

<<पण हा लढा सामान्याना आपला वाटला असता काय?>>

निःसंशय पणे होय. मात्र बहुसंख्य जनतेला हा लढा आहे हेच माहीत नव्हते. आपलेच लोक उलटले तर शत्रू काय? इन्ग्रज जर क्रांतीकारकांना पाण्यात पहातील तर नवल नाही. पण तथाकथित महान भारतीय नेत्यांनी केवळ आपल्या नेतृत्वाला बाध येउ नये आणि आपली देवदूताची प्रतिमा भंगू नये म्हणून क्रांतिकारकांचा सातत्याने तिरस्कार केला व आगदी खालच्या पातळीवर उतरून त्यांची बदनामीही केली. सरकार खालोखाल प्रचार माध्यमे यांच्याच हाती होती आणि साहजिकच हे लोक म्हणजे पुण्ड असून यांच्या दांडगाइला काही अर्थ नाही, यांच्या अपकृत्यांचे (?) शासन त्यांना मिळालेच पाहीजे असे गरळ त्यांनी ओकले. २३ डिसेंबर ला व्हाइसरॉय ची गाडी बॉम्ब ने उडविण्याचा प्रयत्न असफ़ल झाला (म्हणजे स्फ़ोट झाला पण आयर्विन वाचला) त्यानंतर गांधींनी यंग इंडिया मधून क्रांतिकारकांची नेहेमी प्रमाणे निंदा तर केलीच पण लगोलग ' कल्ट ऑफ़ बॉम्ब' नावाचा लेख लिहून समस्त क्रांतिकारकांना हिस्त्र खूनी ठरवायचा प्रयत्नही केला. त्याला सडेतोड उत्तर देउन आपल्या संघट्नेचे ध्येय समस्त कॉगेसजन आणि आम जनतेला समजावे या साठी भगवतीचरण यांनी आझादांच्या इच्छेनुसार 'फ़िलॉसॉफ़ी ऑफ़ बॉम्ब' हे पत्रक २६ जानेवारी १९३० रोजी प्रसिद्ध केले. अर्थातच हे भूमीगत राहून व लपून - छपुनच करावे लागत असे. बहुतेक पत्रके जप्त झाली, पकडली गेली तरी जेथे जायला हवे तेथे ते पोचलेच. आपले आदरणीय नेते जे काही करीत होते त्याचा धिक्कारही या पत्रकात अत्यंत संयतपणे करण्यात आला होता, मात्र सत्य परखडपणे   मांडले होते. या पत्रकातील एक छोटासा उतारा मी येथे देत आहे, त्यावरून जनसामांन्याचाच नव्हे तर कॉग्रेसच्याच असंख्य नेत्याचा क्रांतिकारकांना किती पाठिंबा होता ते दिसून येइल. -

" ब्रि. सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे हे कॉन्ग्रेसचे कर्तव्य होते पण तिने ते सोडून क्रांतिकारकांविरुद्ध युद्ध पुकारले आहे, व्हाइसरॉयची स्पेशल ट्रेन उडविण्याच्या २३ डिसेंबरच्या प्रयत्नाचा तिने धिक्कार केलाः पण तो ठरावही १७१३ सदस्यात अवघ्या ३१ च्या क्षुल्लक बहुमतानेच संमत झाला. हेही सरलादेवी चौधराणी यांनी म्हंटल्याप्रमाणे महात्म्याच्या अनुयायांच्या वैयक्तिक एकनिष्ठेमुळे साध्य झाले. यावरून देशाचा क्रांतिकारकांना घट्ट पाठिंबा आहे हे सिद्ध होते आणि कॉन्ग्रेसच्या अहींसेचा बालेकिल्लाही क्रांतिकारकांशी सहमत आहे ते दाखवून दिले म्हणून गांधीजींनाही आमचे धन्यवाद आहेत."

सामान्यांचा उल्लेख केलाच आहात म्हणून सांगतो, आपल्यात एक म्हण आहे - 'भगतसिंह घराघरातून जन्माला यावा असे प्रत्येकालाच वाटते पण तो शेजारच्या घरात, आपल्या नव्हे'. क्रांतिकारकांचे आयुष्य इतके खडतर होते कि असे जीवन जगायला आणि सर्वस्वावर पाणी सोडायला सामान्य माणूस कसा काय तयार होइल? आणि जर तसे झाले तर सामान्य आणि असामान्य यात फ़रक तो काय? एकुण सार असे कि ज्यांना क्रांति आणि क्रांतीकारक हे माहीत होते त्या सर्वांचा त्याना पुर्ण पाठिंबा होता आणि त्यांचा लढा हा आपला लढा वाटत होता, फ़क्त भयंकर परिणाम लक्षात घेता तो त्यांना व्यक्त करता येत नव्हता.