माधवराव,
  सिनेमा बघताना वा गाणे ऐकताना अंगावर रोमांच उभे रहातात हे मेंदुमुळे होते. मेंदूत प्रत्येक संवेदना विद्युत रुपात वावरते. सुगंध वा दुर्गंध, भीती वा आनंद सगळ्याच घटना विद्युत रुपात पाठवल्या जातात. तेव्हा मंत्रांचाही तोच परिणाम होणार. अगदी गाढवाचे ओरडणे ऐका वा वेदमंत्र ऐका. कान ती माहिती विद्युत रूपाने मेंदूत पाठवतात. मग मंत्रांचे वेगळे वैशिष्ट्य ते काय? आणि ह्या सगळ्या जैववैज्ञानिक घटना विविध उपकरणांनी मोजता येतात.


 बाकी क्षेत्रातील पोषाखांवर, जसे सैनिकी पोषाख, अतीस्वच्छ कक्षातील पोषाख, पाणबुडे, पोहण्याचा वेष यात कितीतरी संशोधन झाले आहे. गेल्या शंभर वर्षात त्यात अनेक सुधारणा झाल्या. तसे सोवळ्याचे झाले का? आजिबात नाही. कारण ती एक रुढी आहे. त्यात असलेच तर मिथ्य विज्ञान आहे.
  आपण एकदा म्हणता की मंत्र तंत्र हे विज्ञान आहे म्हणजे मंत्रतंत्र अमक्या लहरी सोडतात आणि त्यामुळे काही चांगला परिणाम होतो. एकदा म्हणता ती एक हिप्नॉटिजम सारखी थेरपी वा उपचारपध्दती आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पहिली मोजता येणारी राशी आहे दुसरी मोजता येत नाही.


    एखादा ध्वनी वा अन्य संवेदनातून बनणारी मेंदूकडे जाणारी वीज आणि रेशमातील स्टॅटिक विद्युत् ह्यांचा काहीही संबंध नाही. मूळात कुठल्यातरी धार्मिक मंत्रात रेशमातून निघणारी वीज माझ्या हृदयाचे आरोग्य वाढवो अशा अर्थाचे काही सांगते का? गणपतीची पूजा, रुद्र व अन्य पूजा, स्नान संध्या यात शरीराची शुद्धी म्हणून काही विधी केले जातात. ते संकेतापुरते असतात. त्यात विजेचा (स्थिर वा चल) उल्लेख नाही. मग हे आपल्या लोकांना आधीच माहित होते असे आपण का म्हणता? तसे काही मंत्र पाहण्यात आलेत का? आणि मग जर इतके सगळे माहित होते तर कुलंब, गॉस, ऍम्पियर, फॅरेडे सारखे कुठलेही शोध आपल्या वेदपारंगत ब्राह्मणांनी का नाही लावले?