पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या प्रतापगड येथे झालेल्या भेटीच्या वेळेस अफजलखान याने दगाफटका करुन शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजलखानरुपी राक्षसाचा शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. इंग्रजी कालगणनेनुसार येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा दिवस येत असून यंदाच्या वर्षी या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वाई येथील प्रतापगड उत्सव समितीने वाई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले ...