...त्याची म्हैस ! शिवसेना काय किंवा मनसे काय, मराठीसाठी दंडेली करून सामान्यांच्या भावनेला साद देण्याचा उद्योग जे करतील त्यांना संजीवन मिळत राहील. अबू आझमीचा लखनौत सत्कार केला जातो, पण मराठी जिथे राजभाषा आहे, तेथील विधानसभेत मराठीचा आग्रह धरणे गुन्हा ठरावा? आझमीला कुणी कांही त्यांच्या घरी मराठी बोलण्याचा आग्रह केला नव्हता. राजभाषा म्हणून हिंदीला केंद्रात जे स्थान आहे तेच मराठीला राज्यात आहे. म्हणूनच सरकारनेही अमराठी आमदारांनी निदान विधानकामकाजात मराठीचा मान ठेवण्याचा आग्रह धरावयास हवा. सरकारी नोकरांना मराठी येत नसेल तर मराठी शिकणे आवश्यक असते. (अहिंदी केंद्र सरकारी नोकरांना हिंदीच्या परीक्षा देणे अनिवार्य आहेच.) हीच बाब आमदारांना/खासदारांना कां लागू नसावी?
-आता, शिवसेनेला (किंवा इतर कोणालाही) उभं राहायचं असेल तर पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. ["ग्रास रुट" (प्रतिशब्द? )] तळागाळावर जाऊन काम करावं लागेल. केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जयंतीपुरतं काम करून चालणार नाही तर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना काम मिळवून द्यावं लागेल.....
- सहमत आहे. त्याचबरोबर मराठी तरुणांनाही अंग झाडून मेहनत करणे मनावर घ्यावे लागेल. 'स्वच्छ गळपट्टी'कामाची अपेक्षा करायची आणि पडेल ते काम हिरिरीने करणाऱ्यांना बाहेरची वाट धरावयास सांगायचे, हे खरे नाही. शहरातून ती माणसे जी कामे करीत आहेत, त्या जिद्दीने मराठी तरूण उभा राहातो आहे कां? गाद्या तयार करणाऱ्या एका उ. भा. ने मला एक मजेदार गोष्ट सांगितली... या मुंबैत जो येईल तो भुका मरणार नाही; तसा महालक्ष्मीचा वर आहे, आणि, त्या देवीच्या आज्ञेने कुबेराने अशी व्यवस्था केली आहे की येथे येऊन कुणी जे कमावेल ते तो मुंवईबाहेर घेऊन जाऊ शकणार नाही.. ते त्याला इथेच वापरावे लागेल! म्हणून मुंवैची श्रीमंती अबाधित आहे.