अगदी रहस्यमयी कथेसारखा शेवट केलायस तू. मी जादूगाराच्या पोतडीतून काढावी तशी ती अडेलतट्टू पोपटीबिनबंदाची पर्स पिशवीतून काढून त्यांच्यासमोर धरली. त्यांनी माझ्याकडे बुचकळलेल्या नजरेने पाहिले. तो शिवलेला चौकोन मी त्यांच्याहातांत कोंबला व मोठ्या ऐटीत उद्गारले, "बघा बरं, डोक्याला बसते आहे का ही टोपी... " त्यांनीही लगेच ती नक्षीदार, जाळीदार 'टोपी'डोक्यावर चढवली. अगदी फिट्ट बसली. कानही झाकले जात होते.
खरंच अतिसुंदर शब्दालंकार वापरण्यात आले आहेत.
अभिनंदन.