मी व्हीके यांच्याशी एकदम सहमत आहे. सचिन काही निर्बुद्ध खेळाडू नाही. सध्या मुंबईत जे काही चालू आहे ते त्याला कळत नाही का? शिवाय समजा पत्रकारांनी त्याला विचारले असेल की "मुंबई कोणाची? " तर तो "महाराष्ट्राची". असे उत्तर देऊ शकला असता. (मला नेमका प्रश्न माहित नाही.)  'सकाळ' मधल्या बातमी प्रमाणे त्याला हे विचारले की मुंबई कोणाची? तर त्याने उत्तर दिले की मुंबई सर्वांची. आता एक प्रश्न उरतो की त्याला जर कोणी विचारले की बाबा रे तू राहतोस ते घर कोणाचे? तर तो असे उत्तर देईल का की सर्वांचे ? मुख्य म्हणजे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जर कोणी लढत असेल तर त्याला साथ देणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य असायला हवे. गुजरात गुजराती माणसाचा आहे. बंगाल बंगाली माणसाचा आहे मग महाराष्ट्र मराठी माणसाचा आहेच ना? आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती महाराष्ट्राची आणि ओघानेच मराठी माणसाची आहे. तिच्यावर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. सचिन तर हसत हसत हा प्रश्न टोलवू शकला असता आणि आणखी महान फलंदाज ठरला असता. त्याने नसता वाद ओढवून घेतला आहे.