आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनः पूर्वक धन्यवाद! संजोपराव, तुमचं म्हणणं पटतंय हो.... पण प्लास्टिक, थर्मोकोल च्या अनैसर्गिक जमान्यात पत्रावळी परवडल्या असेच म्हणायची वेळ येते :( !! झाडांची पाने न ओरबाडता, त्यांना हानी न पोहोचविता पत्रावळी-द्रोण तयार झाले तर ते कोणाला नकोय? पण दुर्दैवाने तसे होत नाही. त्यासाठी आरोग्याला सुरक्षित पण निसर्गाच्या दृष्टीने अनुकूल अशा प्रकारच्या पत्रावळी बनणे आवश्यक आहे. उद्या रद्दी कागदापासून, आरोग्याला अपाय न करणाऱ्या व वापरायला, हाताळायला दणकट अशा प्रकारच्या पत्रावळी बाजारात आल्या तर त्यांचे नक्कीच स्वागत होईल. आपल्यातील निसर्गप्रेमी उद्योजकांनाही त्यासाठी पावले उचलायला हरकत नाही.
जुन्या काळात भारताची लोकसंख्या आतासारखी नव्हती, शिवाय निसर्ग-वने आत्तासारखी विकसनाच्या नावाखाली लुबाडली जात नव्हती. पण आता चित्र वेगळे आहे. तदनुरूप कृतीमध्येही फेरफार घडवून आणणे ही काळाची गरज आहे. मात्र पत्रावळी-द्रोणांच्या खाद्यपदार्थ संबंधित वापरामागे आयुर्वेदाच्या, वनस्पतींच्या विशिष्ट गुणधर्मांच्या संदर्भात काही वेगळा विचार आहे का हेदेखील पाहवयास लागेल.