वैशाली महाराष्ट्रांत राहाते आहे आणि तिला येथल्या राजकारणाची चांगली जाण असावी. तिचें उत्तर असामान्य आहे आणि भल्याभल्यांनाही तें सहज सुचणार नाहीं. सचिन सतत दौऱ्यावर असल्यामुळें त्याला इथल्या राज कारणाची तेवढीशी माहिती नसावी. त्यामुळें तेवढें मुरब्बी उत्तर तो देऊं शकला नसावा.
माध्यमें मात्र महाबदमाष आहेत. त्यांना क्रिकेट वा संगीत कशाचेंही सोयरसुतक नाहीं. त्यांना ब्रेकिंक न्यूजशीं मतलब. मग दंगल होवो नाहींतर आणखी कांहीं. निवडणुकींत विकलीं गेलीं आहेत हें तर नुकतेंच दिसलें आहेच. पाश्चात्य देश तर माध्यमांना गिधाडेंच म्हणतात.
सुधीर कांदळकर