वरील प्रतिसादांवरून सिद्ध होते की, नेहमी पत्रकारच चूक असतात. एखाद्याला कोणताही प्रश्न विचारला आणि त्याने काहीही उत्तर दिले तरी शेवटी चूक पत्रकारांचीच, हा चांगला न्याय आहे. आपण दिलेल्या उत्तराचा काय परिणाम होतो हे समजण्याइतपत सचिन प्रगल्भ नाही हे पटले. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुंबई ही बिहार्यांची, उत्तर प्रदेशीयांची आणि बंगला देशीयांचीसुद्धा! सचिनच्या विधानाची दखल घेत, सचिनला बाळ ठाकर्यांनी एक उपदेशपर जाहीर पत्र लिहिले. त्या पत्रावर (सचिन जे मुंबईबद्दल बोलला ते गाळून) निखिल वागळेंनी दिशाभूल करणारी बातमी दिली आणि बाळ ठाकर्यांवर तोंडसुख घेतले. परिणाम काय, तर आय्बीएन लोकमतवर शिवसेनेच्या लोकांचे हल्ले. हा सर्व परिणाम सचिनच्या बावळटपणाचा, असे आपल्याला वाटत नाही?
सचिनने सरळ कबूल करायला हवे होते की "माझ्या तोंडून जे शब्द गेले त्यांचा जर विपरीत अर्थ होत असेल तर ते शब्द मी परत घेतो; आणि त्या संदर्भात बाळ ठाकर्यांनी केलेला उपदेश मी जरूर विचारात घेईन." त्याने असे का केले नाही? तो प्रगल्भ नाही हेच खरे.