या प्रकारातील आचरणाच्या नियमांना 'शास्त्र' म्हणणे मला तरी योग्य वाटत नाही. हे रिवाज मात्र कांही जण, विशेषतः मागच्या पिढीतील व्यक्ती, पाळत होत्या. माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर केलेल्या उदकशांतीवेळी सुपारी उंबऱ्यावर फोडावयास सांगितले गेले. त्यावेळी आलेल्या पुरोहितांना यामागील कारण विचारले. ते निरुत्तर झाले. त्यांना माझ्या समजुतीप्रमाणे जे कारण सांगितले ते असे : सुपारी किंवा नारळ ही शुभत्वदर्शक फळे आहेत. सुपारी दारात फोडल्याने सार्वजनिकरित्या घरातील अपवित्रता संपून अन्नशुद्धी झाल्याचे (रोटीव्यवहार सुरू झाल्याचे) जाहीर होते. म्हणून या रिवाजास महत्त्व दिले असावे.... त्या वेळेला पुरोहितांना ते पटलेही. (ते एम्. कॉम्. होते)
मुद्दा(२) : कमी प्रकाशात नखे काढताना जखम होणे शक्य असते, हेही कारण असावे.