लेख उत्तम. सचिनची कामगिरी वादातीत... हे ही खरे!
मीही सचिनचा चाहता ... पण अनेकवेळा "सचिन आणखी थोडा खेळला असता तर आपण सामना जिंकलो असतो" असे म्हणावेसे वाटतेच ना! असे का बरे?
अर्थातच सामना जिंकून देणे हे सांघिक कर्तव्य असले, आणि सचिनची एकट्याची मक्तेदारी नसली तरी कधी कधी आपला "नैसर्गिक" खेळ करण्याच्या नादात सचिन हकनाक बळी गेला असे वाटत नाही का? (शब्दप्रयोग नीट पाहा ... "विकेट फेकली" असा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला नाही)
उदाहरणार्थ परवाच (५ नोव्हें २००९) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा, हैद्राबादला (चेन्नई नव्हे) झालेला सामना पाहा. विजयासाठी फक्त १९ धावा हव्या असताना सचिन झेलबाद झाला. का? १७५ धावा, १४१ चेंडू, १२४ चा स्ट्राईक रेट अप्रतिम खेळी... पण त्या खेळीचा भारताला उपयोग काय? दीडशे धावांनी हरण्याऐवजी तीन धावांनी हरलो आणि नामुष्की टळली इतकाच ...? सामनावीराचा किताब मिळाला पण संघाचे काय? किमान यावेळेस तरी सचिन स्वतःसाठी खेळून, २०० धावांच्या जवळ गेला असता तर... स्वार्थातून परमार्थ साधला नसता असे वाटत नाही काय?
वीस वर्षे खेळूनही आजपर्यंत एकदिवसीय सामन्यात द्विशतक का ठोकले नाही? कसोटीत त्रिशतक का नाही? प्रश्न कोड्यात टाकणारे आहेत पण रास्त आहेत असे वाटत नाही का?
मान्य आहे की आम्ही सचिनला क्रिकेटचा देव मानतो पण तोही हाडामांसाचा माणूसच आहे. त्याच्याही चुका होतात. पण त्याच चुका परत परत होत असतील तर त्यांस काय म्हणावे? असे वाटते की सचिन हकनाक बाद होतो तेव्हा फक्त आमचा जीव तुटतो की काय?