भोमेकाका
आपण वादग्रस्त विधाने करता आहात.
देवाला स्वतः पृथ्वीवर येता येत नाही म्हणून त्याने सचिनला पाठवले. शरद पवार "मला सचिनच्या रूपाने प्रत्यक्ष देवच भेटला" असे म्हणाले ते काय उगीच? (कोण रे तिकडे "पवारांना पैसा म्हणजे देव आणि सचिनमुळे तो मिळाला म्हणून पवार असे म्हणतात" म्हणणारा?)
मीही सचिनचा चाहता... पण अनेकवेळा "सचिन आणखी थोडा खेळला असता तर आपण सामना जिंकलो असतो" असे म्हणावेसे वाटतेच ना! असे का बरे?
हाच तर्क पुढे चालवायचा तर सचिन लवकर बाद झाला नसता तर २००३ चा वर्ल्ड कप अंतिम सामना आपण जिंकलो नसतो असे लोक म्हणतील. १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये केनिया, नामिबिया अशा बलाढ्य संघांविरुद्ध शतके करणारा सचिन नेमका झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात जायबंदी आणि तो सामना आपण १२ चेंडूत ६ धावा पाहिजे असताना आणि ३ विकेटस हाती असताना ३ विकेटस गमावून हरलो आणि वर्ल्ड कप हातातून गेला. १९९६ च्या वर्ल्ड कप. कलकत्त्याचा उपांत्य फेरीचा श्रीलंकेविरुद्धचा सामना. त्यात सचिन थोडा आणखी खेळला असता तर प्रेक्षकांवर दंगल करायची, कांबळीवर रडायची आणि भारतावर सामना गमवायची पाळी आली नसती. राहता राहिला २००७ चा वर्ल्ड कप. त्याबद्दल काय बोलावे. बर्म्युडाविरुद्धची १४१ धावांची तडाखेबंद खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. आता टीकाकार म्हणतील बांगला देश आणि श्रीलंकेविरुद्ध सचिन खेळला नाही.
आतापर्यंत पाच वर्ल्ड कप मध्ये खेळूनही भारताला एकदाही तो जिंकता आला नाही याचे खापर सचिनवर फोडण्यात अर्थ नाही. मी तर म्हणतो जसे जावेद मियांदाद वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत खेळत राहिला तसेच सचिननेही २०१९ च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळत राहावे. वर्ल्ड कप असाही आपण जिंकत नाहीच. निदान त्याचे धावांचे रेकॉर्ड तरी होईल.
वीस वर्षे खेळूनही आजपर्यंत एकदिवसीय सामन्यात द्विशतक का ठोकले नाही? कसोटीत त्रिशतक का नाही? प्रश्न कोड्यात टाकणारे आहेत पण रास्त आहेत असे वाटत नाही का?
उद्या अटापट्टू, माहेला जयवर्धने यांची द्विशतके सचिनपेक्षा जास्त आहेत, सेहवागने दोन त्रिशतके ठोकली असेही सांगाल. देवावर टीका करावी पण त्याला काही सुमार?
विनायक
(संपादित : प्रशासक)