kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
आपण स्वत:बद्दलच्या किमान पाच प्रतिमा मनात बाळगत असतो आणि सोयीनुसार सयुक्तिक प्रतिमा धारण करतो. त्यामुळे आपली खरीखुरी, अगदी प्रामाणिक, पारदर्शक प्रतिमा कोणती हे कित्येकदा आपल्यालाच ठरविता येत नाही. धारण केलेल्या प्रतिमा आणि आपले अस्सल स्वरूप यातील अंतर जर बरेच असेल तर, आणि शिवाय त्या विविध प्रतिमांमधले अंतरही खूप असेल तर, कळत-नकळत आपल्या मनात आणि स्वभावात तणाव तयार होतात. जर कुटुंबातील वा आपल्या मित्रपरिवार- सहकाऱ्यांमधील सर्वच जण अशा बहुविध स्व-प्रतिमा घेऊन वावरत असतील, तर कुटुंबातील व आपल्या नात्यांमध्ये तणावच नव्हे तर संघर्षच निर्माण ...