'ताबा घेई मनाचा, प्रथम भेटी
पसरे मग जशा कँन्सरच्या गाठी' - अगदी खरंय्!
-पण शेवटच्या ओळींत अंधश्रद्धाच आहे असें वाटतें - सुधीरजी म्हणतात, त्यासंदर्भात असे वाटते की, गुरुकृपा व्यावहारिक पातळीवर अंधश्रद्धा असेलच असे नाही म्हणता येत. वडिलकीच्या नात्याने दिलेला हितकारक सल्ला आणि अंद्धश्रद्धा सदरात मोडणारा उपदेश यातील फरक बऱ्याच वेळा अनुभवास येतो. त्रयस्थ भूमिकेतून एखाद्या समस्येकडे बघून विवेकाने निर्णय घेणे यासाठी अनुभवी, विचारी व्यक्ती लाभणे हेही भाग्यच.