"मुंबई सर्वांची आहे" हे सचिनने सगळ्या गोष्टींचा विचार करूनच म्हटले
असावे, असे मला वाटते. मी सचिन तेंडुलकर ह्याचे अभिनंदन करतो. माझ्या माहितीनुसार सध्यातरी मुंबई व महाराष्ट्र भारताचा भाग आहेत. भारत आम्हा सर्व भारतीयांचा आहे. चूभूद्याघ्या. एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून तो प्रगल्भ नाही, बावळट आहे अशी
विधाने करणे म्हणजे फालतूपणा आहे.
तुमच्यासाठी काही प्रश्न:
गुंडगिरीला न घाबरता एखादे वक्तव्य करणे म्हणजे बावळटपणा काय?
काही गुंड व त्यांचे बगलबच्चे चवताळतील, रागावतील म्हणून मनातले बोलायचे नाही काय?
तुम्हाला लोकशाहीत मूग गिळून बसणारी जनता हवी आहे आहे काय?
ठोकशाहीचा मार्ग अवलंबणारे शिवसेना व मनसेवाले अतिशय प्रगल्भ आहेत, असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
मुळात हा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?