काळानुसार यातही बदल हवाच. आज २१व्या शतकातही लोकं ग्रहणानंतर घरातले पाणी ओतून टाकतात. त्यांच्या मनात हा साधा विचार येत नाही की ज्या नदीतून किंवा तलावातून ते पाणी येते त्याच्यावर तर ग्रहणाची 'सावली' पडलीच आहे. मग घरातले पाणीच फेकून काय होणार? शिवाय त्यातही चालबाजी अशी असते की फ्रीजमधल्या दूध, साय, विरजण यात मात्र तुळशीपत्र टाकून ठेवतात. त्यामुळे ते फेकले नाही तरी चालते. आज खरं तर पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे की जितके पाणी वाचवू तितके कमीच आहे. पिण्यायोग्य पाण्याचे साठे पृथ्वीच्या पाठीवरून नाहीसे होत असताना तरी लोकांनी शहाणे होण्याची गरज आहे. आजच्या जमान्यात खरोखरीच या गोष्टी पाळणे मूर्खपणा आहे. एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल सुनील जोशींना धन्यवाद. मुद्दा क्र. ४ साठी मी पण सुधीरजींशी सहमत. गंमत जाऊ दे. पण नवरा बाहेर जाताना बायकोने दारात येण्याला शास्त्राचा आधार नसावा. बाहेर पडलेला माणूस कदाचित त्याची काही वस्तू विसरला तर त्याला मागे यावे न लागता दारात उभ्या व्यक्तीने ती द्यावी अशी भावना त्या मागे असावी. मी तर मुलगा बाहेर निघाला तरी गॅलरीत जाते. कारण काही विसरला तर पुन्हा वर येण्याइतका वेळ नसतो.