आम्ही लहान असताना दर सुट्टीत आजोळी जायचो. वडील शिक्षक असल्याने (जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या म्हणून आधीच) मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्हांला परत न्यायला यायचे. त्या वेळी एकदा आजी वडिलांशी भांडल्याचे आठवते. कारण होते, आईने (म्हणजे आजीच्या माहेरवाशिणीने) सासरी परत जाताना 'कुदिन' टाळावा. आजीच्या मते बुधवार, शनिवार नि आमावस्या हे दिवस (नि रात्रही)टाळावेत. बुधवार का हे अजूनही कळलेले नाही. आता आमच्या भावजयी केव्हाही अगदी रात्रीसुद्धा माहेर-सासर यात्रा करतात. दोन्हीत काय फरक पडला हे मला तरी कळलेले नाही.
बाकी शुद्ध मराठी यांचा केरसुणीचा मुद्दा पटला. आम्ही एकदा सापही केराच्या जवळ ठेवलेल्या केरसुणीखाली पाहिला आहे. पण पावसाळ्यात कोरडेपणा ठेवला, स्वच्छता ठेवली नि मुख्य म्हणजे केरकचरा साचू दिला नाही तर या गोष्टी यायचा प्रश्न येणार नाही.