आहेत कां? खरें तर मूठभर धनिकांनींच प्रथम मूठभर राजकारण्यांना आणि मूठभर नोकरशहांना भ्रष्टाचारी बनवलें. आणि ती लालसा आतां अस्मानाला भिडून भ्रष्टाचार हा समाजाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण तो वेगळा विषय आहे.
आज भ्रष्टाचाराइतकीच लांडीलबाडी ही व्यापाराचा अविभाज्य भाग झाली आहे. व्यवहार असें गोंडस नांव दिलें गेलेली. साठेबाजीनें निर्माण केलेल्या कृत्रिम भाववाढीबद्दल सगळेच लोक गप्प कां? सणांचा हंगाम आल्यावर सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात. तर मग ते सण संपल्यावर पूर्ववत कां होत नाहींत? मग मागणी कमी, पुरवठा जास्त तर भाव कमी असें कां होत नाहीं?
सुधीर कांदळकर