थोडक्यात असे की जे रीतिरिवाज स्वच्छतेशी आणि सुरक्षिततेशी संबंधित आहेत ते तसेच राहू द्यावेत, ज्यांना कुठलाही शास्त्रीय आधार सापडू शकणार नाहीत ते त्यागावेत. उदाहरणार्थ मुहूर्त बघणे, वास्तुशास्त्र अनुसरणे वगैरे .
आम्ही प्रवासाला, सिनेमा-नाटक-प्रदर्शनाला शक्यतो मंगळवार-बुधवार-गुरुवारीच जातो; गर्दी कमी असते. अमावास्येला चांदण्यात फिरायला जात नाही; विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडत असला तर झाडाखाली थांबत नाही(भूत धरते!).
अवांतरः पावसाळ्यात घर कोरडे ठेवणे नेहमीच शक्य नसते.