...तर येशील कधी ?
अशी म्हण ऐकल्याचे आठवते आहे.

कधी कधी अशा रूढी बनण्यामागे "गतानुगतिको लोको" असण्याची शक्यता असते.

माझी एक स्ट्रसबर्ग - फ्रान्स मधील गम्मत आठवते आहे. मी व माझे दोन सहकारी आमच्या विसाची मुदत वाढवून घ्यायची होती. त्यासाठी आम्ही आमच्या एका फ्रेंच सहकाऱ्याबरोबर गेलो होतो. निघालो आणि जराच वेळात एक मांजर आडवी गेली ! आणि त्या दिवशी आम्हाला फिर-फिर फिरून पार्किंगच मिळाले नाही त्यामुळे आमचे काम झाले नाही !  तेंव्हा आम्ही फ्रेंच मांजरं ही भारतीय मांजरांसारखीच शक्तिमान असतात म्हणून खूप हसलो होतो...  
दुसऱ्या दिवशी आम्ही जेंव्हा पारपत्र ताब्यात घ्यायला गेलो, तेंव्हा दूतावासातील महिलेने आम्हाला दूरून पाहूनच काऊंटरवरूनच आमचे पारपत्र हसून झेंड्यासारखे फडकावून दाखवले.. आमचे काम झाले होते  (आणि आदल्यादिवशीच का नाही आलात म्हणून विचारले   )  [तिला आम्ही आमची मांजराची गम्मत सांगितली नाही.. नाहीतर आमचा विसाच रद्द झाला असता  ]