"सुखांत" चा प्रोमो बघितला. चित्रपटाची कल्पना आली. माझ्या मते दयामरण कायद्याने संमत करावे. कारण आपला माणूस प्रत्येकालाच प्रिय असतो. पण त्याला परावलंबी आयुष्य जगताना बघणे हा खरोखरच यातनामय अनुभव असतो. हा कायदा संमत करण्यात एक धोका आहे की कोणी स्वार्थासाठी 'वाटेतला काटा' दूर करण्याचा प्रयत्न करेल. पण त्यावर उपाय काढता येईल. आपल्याकडे कोणत्या कायद्याला पळवाट नाही? एक करता येईल. ज्या व्यक्तीला दयामरण हवे असेल त्या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्टीफिकिट स्वतः न्यायाधिशांनी बघावे. त्या डॉक्टरांशी प्रत्यक्ष बोलावे. नंतर निर्णय द्यावा. अशा व्यक्ती स्वतःहून कोर्टात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हा त्रास देण्यापेक्षा न्यायाधिशांनी त्या व्यक्ती जवळ जावे. त्या व्यक्तीची परिस्थिती खरच दयामरणाला योग्य आहे की नाही हे न्यायाधिशांनी स्वतः ठरवावे.त्या व्यक्तीचा मेंदू जर शाबूत असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलावे.  यात माझ्या मते धोका थोडा तरी कमी होऊ शकतो.