या साऱ्यांचे उत्तर बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे एकच - मराठी माणूस, राजकारणी, पक्ष हे मराठीच्या मुद्द्यावर कधीही एक होत नाहीत. अर्थात याचे मूळ मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे पहिल्या निवडणूकीत आहे. ज्या काँग्रेसने सूर्य चंद्र आकाशात असे पर्यंत संयुक्त महाराष्ट्र होऊ देणार नाही, मुंबई महाराष्ट्राला देणार नाही असेच नेहमीच म्हटले, महाराष्ट्राच्या स्थापनेला कडाडून विरोध केला, त्याच काँग्रेसला मराठी माणसाने सत्ता दिली, तेथेच मराठी माणूस कायमचा हरला. आता राजकारणात मराठी माणसाला किंमत शून्य.