गंमत अशी, की फक्त हिंदी वाहिन्याच असा मराठीचा अविरत द्वेष करतात, गुजराथी, बंगाली आणि दक्षिणी भारतीय वाहिन्या करत नाहीत. असे का? कारण त्यांना प्रांतिक अस्मिता आहे.  ते दुसऱ्या प्रांतात घुसखोरी करून शिरजोरी करीत नाहीत.

शिवसेनेशी वैर असल्याने आय्‌बी‌एन लोकमत बाळ ठाकऱ्यांवर शरसंधान करते, ते आपण समजू शकतो.  पण असे करताना सचिन  मुंबईबद्दल जे बोलला आहे त्या विधानाचा उल्लेखही न करताना सचिन कसा महाराष्ट्रावर प्रेम करतो, तो कसा अस्सल भारतीय आहे वगैरे संबंध नसलेल्या विधानांचा दूरदर्शन बघणाऱ्यांवर पुन्हापुन्हा मारा केला जातो. वैर करताना निदान सत्याचा अपलाप करू नये. अधिक माहितीसाठी आजच्या(२३-११-२००९) दैनिक सामनाचा अग्रलेख वाचावा. सुरुवातीला भयंकर शिवराळ भाषा आहे, पण पुढचे बरेचसे लिखाण सच्चे आहे.       दुवा क्र. १

(संपादित : प्रशासक)