सर्वसाक्षी यांस,
आपला प्रत्येक मुद्दा पटला - इतिहास वाचल्यावर माझीही काही मते अशीच आहेत-
स्वतःची प्रतिमा उंचावण्याच्या नादात "त्यांनी" सर्व क्रांतिकारकांना खुनी ठरवले - वृत्तपत्रांमधून एकाच पक्षाची भलामण होत होती - "आम्ही"च हिंदुस्तान स्वतंत्र करायचा ठेका घेतला आहे असा स्पष्ट प्रचार व विचार पद्धतशीरपणे फैलवला जात होता- मग "त्यांच्या" विचारांविरूद्ध जाऊन जर कोणी स्वातंत्र्य मिळवले असते तर 'नाक कापले गेले' असते ना ! वैचारीक विरोधाची पातळी वैयक्तिक केली गेली व त्यासाठी धादांत खोट बोलायलाही "त्यांनी" कमी ठेवले नाही.
ह्या जर.... तर चा विषयालाच धरून बोलायचे म्हटले जर मला ईश्वराने 'एक वर माग' म्हटले तर ... मी ईश्वराने सईबाईला व शिवाजी महाराजांना २०/२० वर्षांचे आयुष्य जास्त द्यावे असे मागेन. ते जर त्याने दिले असते तर संभाजी वाया गेला नसता व फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा इतिहास आज वेगळा असता.
जर- १२ जून ला ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी साथ दिली असती, तर- १८५७ चे समरसंग्राम यशस्वी झाले असते (व त्याला "बंड"हे नाव दिले गेले नसते)
माझा खरा राग आहे तो "ह्या" लोकांनी महाराष्ट्राला दिलेल्या आज पर्यंतच्या सापत्न वागणुकी बद्दल. आज पर्यंत म्हणजे आज दि. ३ जून २००५ पर्यंतच्या ! शिवाजी महाराजांनी अफजुल (नावाचा रेडा) मारला तर म्हणे धोक्याने खून केला. नानासाहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, राणी लक्ष्मी बाई, ह्या वीरांना त्यांनी नगण्य बंडखोर समजायचे व ग्वाल्हेरच्या भागोजीराव शिंद्याच्या वंशजांना मान मर्तब द्यायचा. वीर सावरकरांना तर जी वागणूक दिली, सोडा- त्यापुढेही जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी "त्यांनी" काय केले हा तर एक अजून चर्चेचा विषय आहे.
आजही मुंबईसाठी च्या स्वतंत्र CEO वरील त्यांची भुमिका पूर्ण महाराष्ट्र विरोधीच आहे. आपले सर्वात मोठे दुर्दैव्य म्हणजे त्यांचे 'तळवे' चाटणारे आपल्यात तेंव्हाही होते व आजही आहेत !
माधव कुळकर्णी.