किन्‍नर उत्तरी भारतातच नसतात, तर तिन्ही लोकांत असतात. मूळ शब्द किम्‌+नर. (हा कुठचा नर? हा तर..) स्वर्गांत ही एक देवयोनी आहे. गंधर्व जसे गातात तसेच हेसुद्धा. आणि अप्सरा नाचतात. नारद-तुंबरु वाद्ये वाजवतात. यक्ष कुबेराचे मदतनीस म्हणून काम करतात. आणखी एक विद्याधर असतात. ते काय करतात कोण जाणे? एक मात्र नक्की, किन्‍नर  ड्रायव्हरचे मदतनीस म्हणून क्लीनरचे काम करीत नाहीत.