अलिबाग अलिबाग येथे हे वाचायला मिळाले:
आपण (म्हणजे इंड्याने- किंवा हल्लीच्या श्टाईलमध्ये टीम ईंड्या ने) जेव्हा २०-२० कप जिंकला तेव्हा माझी नाईट शिफ़्ट असल्याने मी बस साठी प्राजक्ता होटेल जवळ उभा होतो. मलाही क्रिकेटची खूप आवड व थोडेफार कौशल्यही असल्याने निकालाची उत्सुकता होतीच, पण वयानुसार जे एक भान येते त्यानुसार असेही वाटत होते कि आपली टीम जिंकण्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय असा बदल होणार आहे? तेवढ्यात फटाके उडायला सुरुवात झाली- आणि एक तरूण मुलांचे टोळके २-३ मोटारसायकली घेऊन हातात तिरंगा घेऊन बेहोष होऊन घोषणा देत अलिबागभर विजयाची जणू पताका घेऊन फिरताना दिसले. ...