श्रीयुत द्वारकानाथ,

तुम्ही एका अत्यंत स्फोटक विषयाला हात घातला आहे. खरे तर हा एक स्वंतंत्र चर्चेचा विषयच होऊ शकतो.

इतिहासात जर-तर ला स्थान नाही हे खरेच. तरीही, इतिहासातील जर-तर ची चर्चा नेहमीच होते आणि या पुढेही होतच राहील.

आपले खालील विधान अतिशय महत्वाचे आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे भावूक न होता त्यावर चर्चा करणे खरोखरच कठिण आहे.

त्यांचे सामाजिक, राजकिय आणि आर्थिक प्रश्न सुटु शकले असते काय यावर मला शंकाच वाटते.
हा प्रश्न बराचसा भावनिक असल्यामुळे यावर प्रामाणिक चिंतन आणि मनन आपण करणार आहोत काय हा वेगळा प्रश्नच आहे.

परंतु खरी चर्चा ह्याला अनुषंगानेच झाली पाहिजे असे वाटते.