प्रिय सर्वसाक्षी,

कृपया यावर वेगळे सदर सुरू करावे.

काही मुद्दे अनुत्तरीत राहतात.

१. प्रत्येक घटनेचा अन्वनार्थ गांधींनाच विचार करुन का होतो? एकतर नायक म्हणून अथवा खलनायक म्हणूनच. ५४ कोटीच्या लोकांवर अशी काय मोहीनी घातली गेली हे कळतच नाही.
२. कॉग्रेसमध्ये सुध्दा जहाळ नेते होते, सावरकर सुध्दा क्रांतीकारक होते, पण सरसकट बॉम्ब, गोळ्या, याचा त्यांनी पुरस्कार केला नाही. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात हिंसाचाराचा मार्ग हा भस्मासुरासारखा राहील हा सुज्ञपणा आपल्या नेत्यामध्ये होता. क्रांती आणि लोकशिक्षणाचा मार्गच स्विकारला.
३. गांधीचे एक वैशिष्ठे मानले पाहिजे, अनेकवेळेस त्यांच्या विरोधात राष्ट्रीय नेते गेले, कार्यकारीणी गेली, विरोधात कॉग्रेसमधील गट-उपगट होते, संस्थानीक, ब्रिटिश शासन इत्यादी असतांनाही त्यांची राजकारणावरची पकड मात्र कधीही सैल पडली नाही.  

त्यामुळे भगतसिंगासारखे भिमपराक्रमी लोकांचा पराक्रम काही काळापुरताच लोकांना जागृत करतो, त्यांना भव्यदिव्याचे आकर्षण दाखवतो. परंतु दिर्घकाळीन मात्र तो मार्ग दाखवु शकत नाही हे नमुद करावे लागते.

मी यात माझे मत एक वाद म्हणुन लिहित नसुन, अश्या घटनांवर सर्व बाजुने विचार व्हावा म्हणून लिहित आहे अशी नोंद सर्व मनोगतींनी घ्यावी ही विनंती.

द्वारकानाथ