धन्यवाद भोमेकाका, पण आपण केलेले अभिनंदन मी एकटी घेऊ शकत नाही. माझ्या आईवडलांचा हिंदी-मराठी दोन्ही भाषांतील साहित्याचा व्यासंग होता. त्यामुळे आमच्या घरी हिंदी-मराठी, मराठी-हिंदी, हिंदी-उर्दू वगैरे शब्दकोश होते. ते आता कुणाजवळ आहेत हेही मला आठवत नव्हते. ह्या घडा-धडा प्रकरणाबद्दल मी माझ्या बहिणीकडे पृच्छा केली. तीही घडाच म्हणाली! पण मी तसे नाही म्हटल्यावर तिने घरातून कोश शोधून काढून ही सर्व माहिती मला पाठवली. तेव्हा संशोधन तिचे आहे. असो. एकूण हा सर्वच प्रकार मला आनंददायी वाटला.
मीरा