द्वारकानाथजी आपण मांडलेला खालील मुद्दाही प्रभावी आहेच -
"गांधीचे एक वैशिष्ठे मानले पाहिजे, अनेकवेळेस त्यांच्या विरोधात राष्ट्रीय नेते गेले, कार्यकारीणी गेली, विरोधात कॉग्रेसमधील गट-उपगट होते, संस्थानीक, ब्रिटिश शासन इत्यादी असतांनाही त्यांची राजकारणावरची पकड मात्र कधीही सैल पडली नाही.
त्यामुळे भगतसिंगासारखे भिमपराक्रमी लोकांचा पराक्रम काही काळापुरताच लोकांना जागृत करतो, त्यांना भव्यदिव्याचे आकर्षण दाखवतो. परंतु दिर्घकाळीन मात्र तो मार्ग दाखवु शकत नाही हे नमुद करावे लागते."
हे मलाही मान्य आहे - गांधीच्या विरोधात अनेक शक्ती असूनही त्यांनी स्वातंत्र्याची लढाई शांततेने लढली. पण मी श्री. मोहनदास करमचंद गांधींच्या वैयक्तिक विरोधात नाहीच - मी जे गोडवे गातोय ते एका संघटनेचे आहेत, त्या संगठनेच्या विचारांचे आहेत त्यात श्री गांधी सामील होते की नाही हा वेगळा विषय आहे. असेही मी इतर जी उदाहरणे दिली आहेत त्या काळात श्री गांधी नव्हतेच - मी संयुक्त महाराष्ट्र किंवा आज मुंबई साठी स्वतंत्र CEO ची घोषणा (ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला विश्वासात न घेता) करून एक केंद्रीय मंत्री पसार झाले त्या 'प्रवृत्ती' बद्दल बोलत आहे. त्या प्रवृत्तीने महाराष्ट्रावर सतत अन्याय केला आहे व हे इतिहासापासून चालत आले आहे असे माझ्या म्हणण्याचा उद्देश्य आहे.
माधव कुळकर्णी.