नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
वा! चांगला शेर. 'अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी' असे स्वतःच का म्हटले असावे? असे असले तरी खालची ओळ फार फार आवडली.

रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी
वा छान.मराठीत 'मौसमी'चे बहुधा 'मोसमी' होते.

ही गझल गायनानुकूल आहे असे वाटते.  एकंदर चांगली झाली आहे.