मी दिलसेशी मनापासून सहमत आहे. हा सगळा प्रकार संतापजनकच आहे. पण निदान सचिनला तरी "मुंबई महाराष्ट्राची" असे सांगायला हरकत नव्हती. एक मराठी माणूस आणि मुंबईकर या नात्याने मुंबईत काय चालले आहे हे न कळण्या इतका तो मठ्ठ नाही. त्याच्या या उत्तराने तो रसिकांचा आणखी लाडका झाला असता. आपल्या (मराठी माणसाच्या) बोटचेप्या धोरणामुळेच यु.पी. वाल्यांना "यू. पी. तो हमारी है, अब महाराष्ट्र की बारी है. " असे उघड म्हणायला लाज वाटत नाही.