ज्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरावर मात्रा हवी होते तिथे अनुस्वार दिल्यामुळे बोलीभाषेचा आभास होतो आहे. पण अनेक अनुस्वार उमटलेलेच नाहीत, त्यामुळे काही शब्द अर्थभ्रष्ट झाले आहेत.
उदाहरणार्थः कस(सत्त्व?), असत(होते?), क्षितिजाच(हो, ती क्षितिजाच असावी!), जवळच(अगदी जवळ), जात(ज्ञाति) वगैरे. असेच हा शब्द असंच असाच लिहिला असता तरी खपून गेला असता, पण असच लिहिल्याने असत्य असा अर्थ संभवतो.
बाकी कविता बरी. तरीपण एक शंका--प्रकाशाची तिरीप ऐकता येते?