पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
महापौरपदाच्या सोडतीचे आरक्षण नुकतेच मंत्रालयात जाहीर झाले आणि बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या तमाम महिला नगरसेविकांना महापौरपदाचा शालू आपल्यालाच मिळणार, अशी स्वप्ने पडायला लागली. अर्थात महापौरपदाची माळ एकाच महिला नगरसेविकेच्या गळ्यात पडणार असल्याने प्रत्येकीने आपापल्या परीने मार्चेबांधणी करायला सुरुवात केली. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चार ते पाच महिला नगरसेविकांची गुप्त बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत प्रत्येकीने आपल्यालाच हे पद का मिळाले पाहिजे ते ठासून सांगितले. त्या बैठकीचा गुप्त वृत्तान्त आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळला. आज तो सादर ...