मला गंमत वाटते दोन दृष्टिकोनांची. घटना एकच.
एकाला काही वस्तूंची किंमत नाही. दुसऱ्याला खूप किंमत.
कंपन्यांमध्ये इतक्या संख्येने व्यवहार चालत असतात की, प्रत्येक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवणे त्यांना शक्य होत नाही, असे गृहित धरायचे का?
कंपन्यांनी या कामासाठी मनुष्यबळ विकास विभागात एखादे पद निर्माण करायला काही हरकत नाही. अशा बारीक गोष्टींमधूनही ग्राहकांशी संबंध जपले जातात, हे त्यांना कळू नये याचे सखेद आश्चर्य वाटते.