काळानुसार आचरण आवश्य बदलावे. वास्तविक पाहता ही गोष्ट स्मृतीही स्वीकारतात. उदा. मनुस्मृती (जिच्यामधील अनेक वाक्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत व बहुतेक सर्व वाक्य अर्धवट ऐकून गैरसमजुतीमुळे झाले आहेत) ही फक्त त्रेतायुगासाठी होती. कलियुगासाठी पाराशरस्मृती आहे, जिच्यामध्ये कलियुगातील आचरणाचे शास्त्र सांगितले आहे. फक्त आचरण बदलतांना जे काही नीतिनियम शारीरिक आरोग्य व मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत, ते 'बुरसटलेले' व 'टाकावू' नाहीत आणि ते पाळावेत. पूर्वी माणसे 'धर्मात सांगितले' म्हटले की आरोग्याचे नियम पाळीत असत. त्यामुळे अशा गोष्टी धर्माच्या चौकटीत मांडल्या गेल्या.