सदस्याला आपल्या वापरायच्या नावात काही बदल करायचे असल्यास खालीलप्रमाणे करता येतील.
१. उजवीकडच्या स्तंभात दिसणाऱ्या आपल्या नावावर टिचकी मारून जे पर्याय दिसतील त्यात 'माझे सदस्यत्व' हा पर्याय निवडावा.
२. वरील पायरीने उघडलेल्या पानावर 'संपादन' हा खण उघडावा व आपल्या वापरायच्या नावात आपल्याला हव्या त्या सुधारणा कराव्या.
अडचणी सुचवणी असल्यास त्या अवश्य मांडाव्या.