नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:
रात्रीचे दहा वाजले होते. रात्रपाळीत पान 1 ची जबाबदारी पार पाडत होतो. नेहमीप्रमाणे बातम्या संपादित करून, पान लावण्यास सुरवात करायची होती. त्यापूर्वी संपादकांशी बोलून घ्यायचे होते. त्यांना फोन केला, तोपर्यंत मुंबईतील घडामोडींची माहिती कुणालाच नव्हती. मुंबईतल्या गोळीबाराचा फ्लॅश कुठल्या तरी चॅनेलवर सुरू झाला होता. सीएसटी स्थानकावर गोळीबार, एवढीच प्राथमिक माहिती कळली होती. कुठल्या तरी माथेफिरूचा असेल, असं समजून त्या विषयाची केवळ ...