मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
मराठी वृत्तपत्रांमध्ये बातमीपेक्षा मताला अधिक किंमत दिली जाते. त्यामुळे वादाचं रुपांतर शिवीगाळीत आणि त्यानंतर हिंसेमधे होणं ही मराठी पत्रकारितेची—अत्रे-ठाकरे-वागळे, परंपरा आहे. प्रभाकर पाध्ये, गोविंद तळवळकर हे या परंपरेला अपवाद ठरणारे संपादक. वादामध्ये वैचारिक उंची आणि आत्मप्रतिष्ठा यांची जाणीवपूर्वक जपणूक त्यांनी केली. पाध्येंपेक्षा तळवळकरांनी बातमीदारीला प्राधान्य दिलं. परंतु मराठी पत्रकारितेचा मूळ प्रवाह अग्रलेखांचाच राह्यला. अग्रलेख, लेख यांमध्ये मत, भूमिका, दृष्टीकोन यांना महत्व असतं. सामान्यजनांना वस्तुस्थिती समजावून सांगणं गरजेचं ...