गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
बादशाह आणि बिरबल चौरस खेळत बसले होते. गप्पांचा विषय वळत वळत खोटं बोलण्यावर आला. बादशहा म्हणाला, झूठबद्दल मला नफरत आहे. कितीही मोठं नुकसान होणार असेल किंवा कितीही जवळची व्यक्ती दुखावणार असेल तरी सत्याची कास सोडू नये. बिरबल म्हणाला, ‘कधी-कधी खोटं बोलावं लागतं’ ते मानायला बादशहा तयार होईना. तेवढय़ात शाही सुवर्ण कारागीर दागिने घेऊन आला. धाकटय़ा बेगमच्या माहेरी लग्न होतं त्यासाठी हे दागिने करायला टाकले होते. धाकटी बेगम अत्यंत तापट स्वभावाची होती. दागिने हाताळताना बादशहाच्या हातून एका ...