नीरज,

तू तुझ्या भावना प्रांजळपणे मांडल्या आहेस. बहुतेक कॉलेज तरुणांचे एक प्रातिनिधिक मनोविश्वच म्हण ना!  

मला तरी वाटते की हे इनफॅच्युएशन (तात्कालीक आकर्षण) आहे. मान्य आहे की तू तिला अजूनही विसरू शकलेला नाहीस, पण याचा अर्थ तुझे तिच्या वर अगदी अमर प्रेम वगैरे आहे असा मुळीच नाही. तुमची तर साधी ओळख देखील नाही. तुझ्या समोर अनेक क्षितिजे आता तर कुठे खुली होत आहेत, या फेज मध्ये तिचा विचार बाजूला ठेव. या वयात अशी ओढ वाटणं साहजीक आहे, पण जसे की तू स्वतःच मान्य करतोस की तो करिअर मधला एक अडथळा आहे.  

तेव्हा आता पुढच्या परीक्षा, सर्टिफिकेशन्स, ट्रेनींग यांवर लक्ष केंद्रीत कर. चांगल्या, पॉझिटिव्ह गोष्टी जसे की व्यायाम, सकाळी पळायला जाणे, संगीत, इंग्लिश स्पिकिंग, अभ्यास यात लक्ष घाल.