"प्रेम म्हणजे ....." ही कविता तुम्हाला चांगलीच माहिती असेल. पण प्रेमात पडणं आणि त्याला लग्नापर्यंत नेणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सध्या केवळ बी. एस्सीच्या दुसऱ्या / तिसऱ्या वर्षाला आहात. त्यामुळे खरंच तुम्हाला जर त्या मुलीशी संसार करायचा असेल तर अभ्यासात अव्वल व्हा. नोकरी/ व्यवसायाचा प्रयत्न करा, आणि मगच पुढचा विचार करा.

नुसतंच विचार करण्यात वेळ नका घालवू भाऊ..... उठा आणि अभ्यासाला लागा.... तुमचं खरंच प्रेम असेल तर ती मिळेलच तुम्हाला, मात्र आधी नोकरी मग छोकरी. काय ?

चुकलं असलं तर माफ करा.

तुम्हाला शुभेच्छा .