धन्यवाद. लिहायचा आळस हो. वासरीबिसरी, रोजनिशी वगैरे ठेवत नाहीं. सहलींत एकेक मागच्या सहलींतल्या आठवणी निघतात. मग घरी आल्यावर संगणकांत टंकित करून ठेवतों. बऱ्याच वेळां संदर्भ आठवत नाहीं तर कधीं तपशील आठवत नाहीं. कधीं तपशिलांत चूक होते आणि नीट संगती लागत नाहीं. मग इतरांच्या आठवणींतून दुरुस्ती केलेली आहे. मग इतरांना दूरध्वनी करून विचारून घेतों आणि निसटलेले संदर्भ वा तपशील भरतों. कधीं प्रकाशचित्रें पाहातांना कांहीं आठवणी जाग्या होतात. कधीं पैसे भरल्याच्या पावत्या, हॉटेलच्या पुस्तिका असें कांहींतरी हाताला लागतें. पावत्यावरच्य तारखा, जुनीं रेलवेची आरक्षणाचीं तिकिटें पाहूनच तपशील जास्त स्पष्ट होतात. अजून कांहीं महिन्यांनीं पाहा, तुम्हांलाही इथें न लिहिलेले तुअमच्या प्रवासांत्तले हृद्य तपशील आठवतील.
सुधीर कांदळकर.