हे काफ लव्ह (calf love) आहे मित्रा :)
टीन एजमध्ये (13 ते 19) प्रत्येकजणच जातो या मांडवाखालून... तूही गेलास...!
आयुष्यभरासाठीची एक गोड हुरहूर खूप कमी जणांच्या वाट्याला येते. तुझ्या ती आली, हे तुझे भाग्य.

आजची तुझी ही परिस्थिती म्हणजे एक भलेमोठे वर्तुळ आहे... कालांतराने याच वर्तुळाचे रूपांतर एका सूक्ष्म बिंदूत होऊन जाईल... पण कालांतराने...! तोवर आहेच हुरहूर... चुटपुट... चुटपुट... हुरहूर!!!