मी ब्रम्हपुत्रा नदित वसलेले माजुली बेटावर गेलो असतांना तेथे या बेटावरील माहिती चे पुस्तक सब-डिविजनल इंफोर्मेशन एंड पब्लीक रिलेशनस ओफिसर यांनी प्रकाशित केलेले मला देण्यात आले त्यात खालिल माहिती दिली आहे.

"कुंडीला हून रुक्मीणीसोबत पळून येत असतांना श्रिक्रूष्ण माजुली या बेटावर थांबले होते तेंव्हा तेथील सौंदर्य बघून रुक्मीणी म्हणाली की हे बेट म्हणजे माझ्या कल्पनेतील द्वारकाच आहे. तेंव्हा श्रिक्रुष्णाने या बेटाला प्रतिद्वारका नाव दिले. अशी आख्यायीका आहे.

अरुणाचलच्या लोहित या जिल्ह्यात रुक्मीणीचा पिता भीष्मक याची भीष्मक नगर ही राजधानी होती, तिचे अवशेष अजूनही तेथे सापडतात. याबाबत विशेष खोलात जाण्याचे मला कारण वाटले नाही. मात्र माझ्या पुढील प्रवासात मी याबाबत सखोल माहिती काढण्याचा प्रयत्न करिन.