हे पुस्तक म्हणजे केवळ माहिती पुस्तक नसून श्री देवधर यांनी १६ वर्षे मेघालयात अतिशय प्रतिकुल परिस्थीत केलेल्या कार्याचे व त्या काळात त्यांना जाणवलेले तेथील परिस्थीतीचे मुल्यमापन आहे. त्या भागातील आदिवासी श्री देवधर यांना आपला कुटुबीय व आधार स्तंभ मानतात यातच त्यांनी तेथे केलेल्या कार्याची महती आहे. आजही ते वर्षातून ४ वेळा जाउन तेथील लोकांमध्ये राहून येतात. यावरून त्यांना हा विषय किती जिव्हाळ्या चा आहे याची साक्ष पटते. त्याचे हे पुस्तक वाचल्यावर आपणास हि या भागाबद्दल आपुलकी निर्माण होते हे विशेष.