पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी मी हे जीवन सुंदर आहे या शीर्षकाअंतर्गत ब्लॉगवर लेखन केले होते. जीवनात अनेक दुख, अडचणी असल्या, जीवन हे क्षणभंगूर असले तरीही आपण प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवावा, उद्याच्या भविष्याची काळजी करण्यात आजचा क्षण वाया घालवू नये, असे लिहिले होते. खरे तर त्याच्या दुसऱयाच दिवशी या विषयासंदर्भातील काही गाणी येथे द्यायची होती. पण दुसऱया विषयावर लेखन केले आणि ते राहून गेले. आज त्याविषयी...