मिलिंद फणसे यांनी लिहिल्याप्रमाणे अकारविल्हे(च) बरोबर. चुकून विल्ल्हे लिहिला गेला होता, तो दुरुस्त करण्याच्या प्रयत्‍नात वेगळीच चूक झाली. चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल संबंधितांचे आभार.
'अकारविले' कधी पाहिला नाही, तो योग्य नसावा. मराठीतल्या विल्हा या शब्दाचे मूळ अरबी आहे, असे कोश सांगतो. विल्हा म्हणजे वर्ग, वाट, दर्जा.   त्यावरून आलेले इतर शब्दः विल्हे, विल्हेवार(री), विल्हेवाट, विल्हे करणे/लावणे, विल्हेस लावणे इ. इ. 

निहाय हा असाच अरबीबरून आलेला एक प्रत्यय. मूळ अर्थ सीमा, पराकाष्ठा वगैरे.  पण मराठीत गणिक अशा अर्थाने निहाय वापरतात.  उदा. शाळानिहाय, जातिनिहाय, जिल्हानिहाय. 

आणखी एक शब्द--मशारनिल्हे. अर्थ: उपरिनिर्दिष्ट, उपरोल्लेखित(इसम, क्वचित मजकूर), वर सांगितल्याप्रमाणे. हा शब्द कधीकधी मशालनिल्ले असाही आढळेल. ह्याचे मूळही अरबी असले पाहिजे.